सोलापूर महानगरपालिका अंतर्गत “माझी वसुंधरा अभियान” व “राष्ट्रीय स्वच्छ वायु उपक्रमाची” अंमलबजावणी करणेत येत असुन शहरातील वाढते कार्बन उत्सर्जन कमी करणेकरिता पर्यावरण पूरक इमारतीची संख्या वाढविणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने शहरस्तरावर उपाययोजना करण्याचे निर्देश मा. शासनाने दिलेले आसुन सोलापूर शहर अंतर्गत सदर पर्यावरण पूरक इमारतीची संख्या वाढविणेकामी नागरिकांमध्ये जाणीवजागृती होणेकामी “बेस्ट ग्रीन बिल्डींग व ग्रीन सोसायटी” स्पर्धेचे आयोजन करणेत येत असुन.
सदर स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या बिल्डींग / सोसायटी धारकांनी स्टार मानांकन मिळणे करिता स्वगृह (SVGRIHA) मधील प्राप्त खालील नमुद निकषांची पुर्तता करणे आवश्यक आहे.
१.इमारती मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग व रेन वॉटर पर्कोलेशन ची प्रक्रिया असणे आवश्यक आहे.
२.इमारतीच्या आवारात बिल्डिंग परवानगी प्रमाणे मोठ्या व छोट्या झाडांची लागवड करणे
आवश्यक आहे.
३.विजेची बचत करणेकामी सोलारची सुविधा ऊपलब्ध असणे आवश्यक आहे.
४.घरातील कचऱ्याचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करणेत येऊन ओल्या कचऱ्यापासून
खतनिर्मिती करणे आवश्यक आहे.
५.जागेचा वापर परवाना असणे आवश्यक आहे.
६.नियमित टॅक्स भरणे आवश्यक आहे.
७.अतिक्रमित जागेमध्ये घर नसणे आवश्यक आहे.
८.बिल्डिंग चे डिझाईन हे LEED व USGBC यांचे निर्देशानुसार असणे आवश्यक आहे.
सदर स्पर्धेचा कालावधी हा दि.०१ जानेवारी २०२१ ते ३१ जानेवारी २०२१ पर्यंत असुन नागरिकांनी आपला सहभाग नोंदविणे करिता दि.०१/०१/२०२१ ते दि. ०५/०१/२०२१ अखेर मा. उपायुक्त-१ यांचे कार्यालयात अथवा env.smc@gmail.com मेल आयडी वरून लेखी स्वरुपात नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे. सदर स्पर्धेचे परीक्षण दि. ०१ फेब्रुवारी २०२१ ते ०५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत नेमणेत आलेल्या कमिटी मार्फत स्पर्धेतील सहभागी इमारतीस प्रत्यक्षात भेट देवून करणेत येणार असुन प्राप्त गुणानुक्रमे १ ते ५ स्टार असे मानांकन देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जास्तीत जास्त मानांकन प्राप्त करणाऱ्या पहिल्या तीन इमारतीना व सोसायटीना अनुक्रमे प्रथम पारितोषिक र.रु.५१,०००/-, द्वितीय पारितोषिक र.रु.२५,०००/- व तृतीय पारितोषिक र.रु.११,१११/- इतके देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा ही विनंती.
सदर स्पर्धेचे सर्व अधिकार हे आयुक्त, सोमपा. यांचेकडे राहतील.
Leave a Reply