बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेता आसिफ बसरा यांनी आत्महत्या केल्याची धर्मशाळामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कांगडा जिल्ह्यातील धर्मशाळामध्ये मॅक्डोलगंज हे थंड हवेचे ठिकाण आहे. याठिकाणच्या जोगिबाडा रोडवर असणाऱ्या एका कॅफेजवळ गुरुवारी त्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचं ठोस कारण अद्याप समजलं नाही.
आसिफ बसरा एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. ‘परजानियां’, ब्लॅक ‘फ्रायडे’ याबरोबच त्यांनी अमेरिकन कॉमेडी सिनेमा ‘आउटसोर्समध्ये’ देखील काम केले होते. हिमाचली सिनेमा सांझमधील त्यांचा अभिनय विशेष गाजला होता.
कांगडाचे एसपी विमुक्त रंजन यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. वयाच्या 53 व्या वर्षी अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण बॉलिवूड हादरले आहे.
आसिफ बसरा गेल्या 5 वर्षांपासून मॅक्डोलगंज मध्ये भाड्याच्या घरात राहत होते, त्यांच्याबरोबर त्यांची एक विदेशी मैत्रिण देखील राहते.आसिफ बसरा UK मधील एका महिलेबरोबर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. गुरुवारी दुपारी ते त्यांच्या कुत्र्याला फिरवून आणण्यासाठी बाहेर गेले होते. घरी आल्यानंतर कुत्र्याच्या दोरीलाच त्यांनी गळफास घेतला. अशी प्राथमिक माहिती मिळते आहे की, गेल्या काही काळापासून ते नैराश्याचा सामना करत होते.
Leave a Reply