‘ब्राह्मण समाज’च्या महामंडळाबाबत राज्यसरकारला निर्देश देणार – राज्यपाल कोश्यारी

मुंबई – समस्त ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने शनिवारी मुंबईतील राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी समस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाबाबात चर्चा केली.

राज्यपालानी राज्य सरकारला सकारात्मक निर्देश देण्याचे वचन दिले . यावेळी ब्रम्ह महाशिखर परिषदेचे प्रवक्ते विश्वजीत देशपांडे यांनी ब्राह्मण समाजाची महाराष्ट्रातील लोकसंख्या व त्यांच्या ग्रामीण भागातील अडचणी राज्यपाल यांना सांगितल्या.
यावेळी मकरंद कुलकर्णी यांनी राज्यसरकारशी आजपर्यंत झालेला पत्रव्यवहार व आजची स्थिती कथन केली .
यावेळी संजीवनी पांडे यांनी ब्राह्मण समाजातील महिलावर्ग त्यांची आर्थिक व शैक्षणिक स्थितीबाबत अडचणी सांगितल्या.

तसेच ॲड.आरती सदावर्ते – पुरंदरे यांनी ब्राह्मण समाजावर होणाऱ्या लिखाणावर बंदी घालावी व ब्राह्मण समाजाच्या संरक्षणासाठी कठोर कायदे करावे अशी मागणी केली.
यावेळी राज्यपाल कोश्यारी

यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेऊन सकारात्मक चर्चा केली.तसेच राज्य सरकारला निर्देश देण्याचे अभिवचन दिले .