विष्णू माने /सोलापूर
कुरनूर धरणला लागून असलेल्या हरणा नदीच्या जवळ वसलेल्या पितापूर भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोनशे ते अडीचशे कुटुंबे राहत असलेल्या पितापूरमध्ये साधारण दोन हजारहून अधिक लोकवस्ती आहे. जवळपास शंभर ते दीडशे घरांमध्ये पाणी शिरले असल्याची प्रतिक्रिया पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी विशेष प्रतिनिधीशी बोलताना दिली .
प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आपत्कालिन परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे आणि तातडीने शासकीय मदत द्यावी अशी मागणी या निमित्ताने त्यांनी केली आहे.
मागील तीस ते चाळीस वर्षात वर्षात अशाप्रकारे मुसळधार पाऊस झाला नाही हे मोठे अस्मानी नाही हे मोठे अस्मानी झाला नाही हे मोठे अस्मानी नाही हे मोठे अस्मानी हे मोठे अस्मानी संकट आहे .प्रशासनाने तातडीने मदत करावी.अशी मागणी सैफन फकीर ,पोलीस पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते ताजोद्दीन चिक्कळी यांनी केली आहे.
राज्यभर सर्वदूर पाऊस असल्याने मागील दोन दिवसापासून जोरदार पावसाची बॅटिंग सुरु आहे .या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहर तालुका व परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. कुरनूर धरणाचे नऊच्या नऊ दरवाजे उघडे करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील ओढे ,नाले, तळी तुडुंब भरले आहेत. बळीराजाच्या हाताला येणारे पीक निघून गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आहे. पितापूरच्या रहिवाशांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
Leave a Reply