Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

सोलापूर, दि.14-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागातर्फे रविवार, 16 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मंदिर स्थापत्य आणि पर्यटन या विषयावर ऑनलाइन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी दिली.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन डेक्कन अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. जी. बी. देगलूरकर यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे उपसचिव राजेशकुमार साहू हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत यावेळी प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

अलीकडच्या काळात मंदिर स्थापत्य आणि पर्यटन या क्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ऐतिहासिक मंदिर स्थापत्य आणि पर्यटन हे विद्यार्थ्यांच्या करिअरचे एक महत्त्वपूर्ण माध्यम बनले आहे. या अनुषंगाने या क्षेत्रातील सद्यस्थितीवर चर्चा करण्याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पुरातत्व विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील यांनी दिली. या चर्चासत्रासाठी चारशे विद्यार्थी व अभ्यासकांनी नोंदणी केल्याची माहिती डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी दिली. याचा अधिकाधिक जणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *