Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

अक्कलकोट,दि.15 : अक्कलकोट तालुक्यात परतीच्या पावसाने सर्वत्र कहर केला असून अनेक गावच्या नदी-नाल्यांना महापूर आल्याने गावचा संपर्क तुटला असून एनडीआरएफच्या मदतीने नदीपलीकडे अडकलेल्या शेकडो नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. हजारो हेक्टर शेतात पाणी शिरल्याने शेतकर्‍यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.

तुळजापूर, उमरगा, अक्कलकोट तालुक्यात चित्रा नक्षत्राच्या पावसाने 13 ऑक्टोंबर ते 14 ऑक्टोंबर दरम्यान झालेल्या तास मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व पाझर तलाव, साठवण तलाव, बंधारे, नदी, नाले, ओढे तुडूंब भरुन वाहत आहेत, तर काही ठिकाणी महापूर आल्याचे चित्र दिसत असल्यामुळे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी तात्काळ मदत कार्य करण्याच्या सूचना दिल्या शंभर वर्षातून पहिल्यांदाच बोरी व हरणा नदीत प्रचंड पंचनामे करण्याचे आदेश दिले. मोठ्या प्रमाणावरपाणी आल्याने नदीकाठच्या गावांना महसूल प्रशासनाकडून सतर्कतेचा ईशारा देण्यात आला होता.

13 व 14 ऑक्टोंबर दरम्यान झालेल्या वादळी वार्‍यासह मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या शेतकर्‍यांचे उभ्या पिकांत पाणी जावून कोट्यावधी रुपये पिकांचे नुकसान झालेले आहे. अनेक घरांची पडझड झाली, शेतात बांधलेली वेळीच सोडविता न आल्यामुळे बुडून मृत्यूमुखी पडले तर शेकडो शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हैशी, बैल या पाण्यात वाहून गेले. बबलाद येथील शेतकरी भैय्या कुलकर्णी यांचे 4 गायी, 2 म्हैशी, 2 वासरु असे 8 जनावरे मुसळधार पावसामुळे दगावली आहेत. यामुळे तालुक्यात बहुतांश ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेले होते. नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे, त्यांच्या नाष्टा, जेवणाची सोय करणे, नदीपलीकडे अडकलेल्या नागरिकांची एनडीआरएफच्या दोन बोटीव्दारे दोन पथकाच्या माध्यमांतून गुरुवारी सुटका करण्यात आली. बोरी रामपूर येथे एका शेतकरी शेतात मुक्कामासाठी गेला होता, पण अचानक पाणी आल्याने बचावासाठी झाडावर चढून बसला होता. तो 36 तासानंतर एनडीआरएफच्या पथकाच्या माध्यमातून सुखरुप सुटका करण्यात आली. आमदार सचिन कल्याणशेट्टी, तहसिलदार अंजली मरोड यांच्यासह एनडीआरएफच्या पथकाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा सुचना देत अडकलेल्या नागरिकांची सुटका करीत ग्रामस्थांना येत असलेल्या अडचणींचे विचारपूस करुन तात्काळ आपदग्रस्तांना जेवण व नाष्ट्याची सोय करुन देत.

हन्नूर, पितापूर, नन्हेगाव, कुरनूर, मोट्याळ, सिंदखेड, शिरसी, सांगवी, ममदाबाद, रामपूर, बोरी उमरगे, मिरजगी, जकापूर, कंठेहळ्ळी, सातनदुधनी, आंदेवाडी, संगोगी (ब), रुद्देवाडी, बिंजगेर, तळेवाड आदी गावांना या महापूराचा मोठा तडाका बसल्याने शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाला आहे.अनेक गावा त लाईट खांब, रोहित्र पडल्याने अनेक गेल्या तीन दिवसापासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. एनडीआरएफच्या माध्यमातून बिंजगेर नदीपलीकडे अडकलेल्या 80 महिला, नागरिक, अबालवृध्दांना सुखरुप बाहेर काढुन सुरक्षितस्थळी पोहोचवण्यात यश आले. तसेच अक्कलकोट येथील रॉबिनहूडआर्मीच्यावतीने सांगवी, रामपूर, शिरसी आदी गावातील पूरग्रस्तांना अन्नदान वाटप करण्यात आले. महापूर आल्यामुळे वागदरी व मैंदर्गी रोडवरील वाहतुक ठप्प झाले आहेत.

कालरात्रीचे पूर परिस्थिती पाहता आमदार सचिन कल्याणशेट्टी जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात होते. महापूरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफ टीमची मागणी करून त्यानुसार दहा जणांचे एक टीमप्रमाणे दोन टीम देण्यात येऊन होते. त्या माध्यमातून बोरी नदीकाठच्या रामपूर, बिंजगेर, तळेवाड, संगोगी (ब) आदी नदीकाठच्या गावातील महापूरात अडकलेल्या ग्रामस्थांची सुखरुप सुटका करण्यासाठी सकाळपासून कार्यरत होते. सायंकाळच्या दरम्यान दोन्ही बोटी नादुरुस्त झाल्याने काही अडकलेल्या नागरिकांना काढता आले नाही. उर्वरित बचावकार्य 16 ऑक्टोंबर रोजी सकाळी करण्याचे ठरले आहे. तरी नदी परिसरातील नागरिकांनी सतर्कतेने रहावे, आपले व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *