मनपाने असा साजरा केला ‘महिला शिक्षण दिन’ ; या आहेत सत्कारमूर्ती…

सोलापूर :
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोलापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने महिला शिक्षण दिनानिमित्त सोलापूर शहरातील उच्च शिक्षणामुळे उच्च पदावर पोहोचलेल्या क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आले.त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी प्रास्ताविक भाषण केले.

या आहेत सत्कारमूर्ती…

महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते व महिला व बालकल्याण समितीचे सभापती कल्पना कारभारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू मृणालिनी फडणवीस तसेच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर व महिला पोलीस प्रशिक्षण केंद्र उपप्राचार्य शीतल वंजारी, गटविकास अधिकारी जास्मिन शेख यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सभागृह नेते श्रीनिवास करली श्रीनिवास करली,विधी समिती सभापती देवी झाडबुके,शहर सुधारणा सभापती मेनका राठोड, गटनेते रियाज खरादी, नगरसेविका सुरेखा काकडे, नगरसेविका परविन इनामदार इनामदार, नगरसेविका संगीता जाधव, नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेविका स्वाती आवळे, नगरसेविका निर्मला तांबे,नगरसेविका रामेश्वरी बिरू,नगरसेवक प्रभाकर जामगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच यावेळी महिला पत्रकार, मनपा मधील उच्चशिक्षित अधिकाऱ्यांचे व शहरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला अधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या वतीने करण्यात आला. सदर कार्यक्रम आयोजनासाठी मा आयुक्त पी शिवशंकर, उपायुक्त जमीर लेंगरेकर, सहाय्यक आयुक्त पुष्पगंध भगत, यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालकल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे, मल्लेश नाराल, पूजाराणी वाघमारे, ऋषिकेश लोखंडे, सविता शिंदे यांनी परिश्रम घेतले.