टेंभुर्णी,दि.27 : अनैतिक संबंधास आड येणाऱ्या मुलाला आईनेच प्रियकराच्या मदतीने ठा र मारल्याची घटना माढा तालुक्यातील परितेवाडी येथे शुक्रवारी उघडकीस आली, याबाबत आई मुक्ताबाई सुभाष जाधव वय 45 हिला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने तिला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे तर प्रियकर फरार आहे.
सिद्धेश्वर सुभाष जाधव वय 22 असे खून झालेल्या मुलाचे नाव असून, ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. याबाबत परितेवाडीचे पोलीस पाटील जिनदास बाळू हराळे यांनी टेंभुणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शितोळे यांनी तपासाची चक्रे फिरवून मुलाची आई मुक्ताबाई हिचे गावातीलच तात्या महादेव कदम याच्याबरोबर अनैतिक संबंध असल्याचे समजले. अधिक तपास करता मुक्ताबाई व तात्या यांचे शेतामध्ये घर, शेजारी शेजारी आहे. त्यामुळे यांचे अनैतिक संबंध गेली चार ते पाच वर्षापासून होते.
हे अनैतिक संबंध मुलाला मान्य नव्हते तेव्हा यांच्या संबंधास मुलाचा अडथळा निर्माण होत असल्याने दोघांनी मिळून सिद्धेश्वर याचा काटा काढण्याचे प्रथमदर्शनी समजल्याने मुक्ताबाईला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने ठोठावली, तर प्रियकर तात्या कदम हा फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास सपोनि अमित शितोळे करत आहेत.
Leave a Reply