दक्षिण सोलापूर ,(विशेष प्रतिनिधी )विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील उमराणी येथील महादेव बहिरगोंडे सावकार यांच्यावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची घटना आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे
महादेव बहिरगोंडे सावकार हे आपल्या साथीदारासह काही कामानिमित्त विजयपूरला गेले होते, कन्हाळे क्राँसजवळ त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला,या गोळीबारात त्यांचे अंगरक्षक साथीदार जागीच ठार झाले तर महादेव बहिरगोंडे यांना तीन गोळी लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे, बहिरगोंडे सावकार यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्या तातडीचे उपचार चालू आहे .
Leave a Reply