मोठी बातमी | सोलापूरमध्ये ‘रेमडेसिव्हिर’चा पुरेसा साठा ; या ठिकाणी..

सोलापूर, दि. 24: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब इंजेक्शनचा साठा मर्यादित असला, तरी तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. या वितरकांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. वितरणामध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी संबं‍धितावर कारवाई करणार असल्याचे  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

            कोरोनाबाधितावर उपचार करताना रुग्णांचे नातेवाईकच डॉक्टर किंवा  रुग्णालयांना रेमडेसिव्हिर किंवा टॉसिलिझुमॅब इंजेक्शन देण्याबाबत आग्रह करत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक कोरोना रुग्णाला ही इंजेक्शन द्यावीच लागतात, असे नाही. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच इंजेक्शन रुग्णांच्या नातेवाईकांनी खरेदी करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी केले आहे.

            या इंजेक्शनच्या गैरप्रकाराबाबत काही माहिती असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर देण्यात यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त नामदेव भालेराव यांनी केले आहे.

       इंजेक्शन उपलब्ध असणारी मेडिकल स्टोअर्स आणि संपर्क नंबर्स

सोलापुरात बलदवा इंटरप्रायजेस (संपर्क-0217-26240749822072130)अश्विनी औषध भांडार (0217-23199009689540365)सीएनएस मेडिकल (8888843673)हुमा फार्मा आणि सर्जिकल्स (9960445558)केशवाह फार्मसी (97659998559049998919)श्री मार्कंडेय औषधी भांडार (0217-27213209822441381)यशोधरा फार्मसी (0217-23230018888049390) आणि श्री महालक्ष्मी मेडिकलबार्शी (02184-2240039420754003)