राहुल गांधींसारखं नेतृत्व काँग्रेसमध्ये नाही -संजय राऊत

मुंबई : काँग्रेसला मोठी  परंपरा आहे. या पक्षाने देशाला अनेक पंतप्रधान दिलेत . त्यामुळे काँग्रेसनं वादळातून स्वतःला सावरावं, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.या त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मिडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत .

देशात राहुल गांधींसारखं नेतृत्व काँग्रेसमध्ये नाही. देशाला आज मजबूत विरोधी पक्षाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेतृत्वाच्या मुद्यावरुन सध्या काँग्रेसमध्ये मोठे वादळ माजले आहे. कॉँग्रेसच्याच २३ ज्येष्ठ नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या वक्तव्यामुळे उलटसुलट चर्चा केली जात आहे.  या शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

अहमद पटेल हे उत्तम ‘मॅनेजर’ किंवा ‘सल्लागार’ आहेत, पण लोकनेते नाहीत. पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांच्याविषयी आम्ही जास्त काय बोलावे? साताऱ्यात निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते. या सर्व मंडळींनी काँग्रेस पक्षाला कायमस्वरुपी सक्रिय अध्यक्ष हवा अशी मागणी सोनिया गांधींकडे करावी याची गंमत वाटते, असे भाष्य शिवसेनेने केले आहे.

तर संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना, पृथ्वीराज चव्हाण मोठे नेते असल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडीत उत्तम समन्वय असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.