शहरात आज निगेटिव्ह 983 तर पॉझिटिव्ह 58 ; तिघांचा मृत्यू

सोलापूर शहर हद्दीत बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत कोरोनाचे 58 रुग्ण आढळले असून यामध्ये 34 पुरुष तर 24 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 147 इतकी आहे. यामध्ये 80 पुरुष तर 67 महिलांचा समावेश होतो.अशी माहिती आज गुरुवारी दुपारी देण्यात आली.

आज गुरूवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 1041 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 983 जणांचे निगेटीव्ह तर 58 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज तिघा पुरुषांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6 हजार 815 असून एकूण मृतांची संख्या 423 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 669 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 5 हजार 723 इतकी आहे.