शहरात आज 887 ‘निगेटिव्ह’ तर 29 ‘पॉझिटिव्ह’ ; दोघांचा मृत्यू

सोलापूर शहर हद्दीत आज बुधवारी कोरोनाचे 29 रुग्ण आढळले असून यामध्ये 19 पुरुष तर 10 स्त्रियांचा समावेश आहे. कोरोनाने मरण पावलेल्यांची 2 इतकी आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 19 इतकी आहे. यामध्ये 10 पुरुष तर ते 9 महिलांचा समावेश होतो

सोमवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 916 जणांचे प्राप्त झाले. त्यामध्ये 887 जणांचे निगेटीव्ह तर 29 जणांचे पॉझिटीव्ह आले. दोन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये 1 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश आहे अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
मयत झालेली व्यक्ती कुमार स्वामी नगर शेळगी परिसरातील असून 59 वर्षाची महिला आहेत .22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजून पन्नास मिनिटांनी त्यांना यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 24 ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.
मयत झालेली दुसरी व्यक्ती बसवराज नगर, जुळे सोलापूर परिसरातील 58 वर्षांचे पुरुष होते. 25 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याच दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.

सुराणा मार्केट, कर्णिक नगर, स्वामी विवेकानंद नगर हत्तुरे वस्ती, आय एम पी ग्रीन जवळ सैफुल ,वसंत विहार अक्कलकोट रोड, योगीनाथ सोसायटी शेळगी, न्यू जगजीवनराम झोपडपट्टी मोदीखाना, सन सिटी बी विंग दमानीनगर ,देशमुख पाटील वस्ती दमाणी नगर,वीनस अपार्टमेंट आसरा चौक ,बसवराज नगर जुळे सोलापूर ,सुंदर नगर शेळगी, पाम हाऊसिंग सोसायटी जवळ, रेणुका नगर जुळे सोलापूर, गीता नगर गोविंद श्री मंगल कार्यालय जवळ, थोबडे वस्ती बस स्टॉप जवळ, एस आर पी कॅम्प विजापूर रोड ,देगाव ,सोलापूर ब्लड बँकेजवळ रेल्वे लाईन भवानी पेठ, महालक्ष्मी सोसायटी शेळगी, सोलापूर येथील रुग्ण बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 6 हजार 411 असून एकूण मृतांची संख्या 405 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 1 हजार 43 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 4 हजार 963 इतकी आहे.