सोलापूर शहरात आज शनिवारी दि.10 ऑक्टोबर रोजी कोरोनाचे नवे 52 रुग्ण आढळले असून यामध्ये 29 पुरुष तर 23 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 76 इतकी आहे.
आज शनिवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 581 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 529 निगेटीव्ह आहेत.
आज 1 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8993 असून एकूण मृतांची संख्या 498 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 812 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 7683 इतकी आहे.
Leave a Reply