शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकापर्ण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.मुंबईतील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.
शिवसेनाप्रमुखांचा मुंबईत उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आहे. नऊ फूट उंच व १२०० किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा बसवण्यात आला आहे.
प्रबोधन प्रकाशनाच्यावतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे.
ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकार केला.
या कार्यक्रमास मंत्री आदित्य ठाकरे, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, छनग भुजबळ, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, म.न.पा. आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासंह राज्यातली सर्वच पक्षाचे प्रमुख नेते व महाविकास आघाडीतील मंत्र्यांची उपस्थिती होती.