सव्वादोन लाख रुपयांची पापारामनगरात घरफोडी

सोलापूर,दि.२५ : विजापूर रस्त्यावरील पापारामनगरातील घर फोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने व रोकड असा सव्वादोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत निर्मला प्रभू राऊतगोळ ( वय ३ ९ ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

राऊतगोळ यांच्या घरातील कपाटामधील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली ७५ हजार रुपयांचे अडीच तोळ्याची सोन्याची मोहनमाळ, ४५ हजारांचे दीड तोळ्याच्या कानातील रिंगा, ३० हजारांचे एक तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट, ३० हजारांच्या एक तोळ्याच्या सोन्याच्या दोन अंगठ्या व ४५ हजारांची रोकड असा मिळून एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. फौजदार मुलाणी हे अधिक तपास करत आहेत.