Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

महेश हणमे /9890440480
मागील शंभर वर्षांत कोसळला नाही असा पाऊस आणि पूर सोलापुरातील नागरिकांनी अनुभवला आहे.आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरचा दौरा करत अक्कलकोट भागातील पूरस्थितीचा आढावा घेतला. शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने अनेक सखल भागात पाणी साचले होते. राहत्या घरात पाणी गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले.त्यात अजून भर पडण्याची शक्यता निर्माण झालीय.शहरातील उत्तर भागातील ओढ्याच्या दोन्ही तीरावर असलेल्या अवंती नगर,अभिमान श्री,वसंत विहार,यश नगर,गायत्री नगर,गणेश नगरसह मडके वस्तीच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

छायाचित्र विनय गोटे

याबाबत सविस्तर वृत्त असे …

हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर सोलापुरातील एकरुख मध्यम प्रकल्प पाणलोट क्षेत्रात येणारा विसर्ग सुरू राहिल्यास प्रवाहामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते. त्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहून जाण्याची शक्यता आहे . त्यामुळे या ओढ्याच्या दोन्ही तीरावर असलेल्या वसलेल्या नगरांना पुराचा धोका होऊ शकतो.

उत्तर सोलापूरातील एकरुख तलाव सोलापूर- तुळजापूर या राष्ट्रीय मार्गावर असून तो शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. सद्यस्थितीत एकरुख तलाव 100 टक्के पूर्ण क्षमतेने भरलेले आहे.अतिवृष्टी झाल्यास सांडव्यातून 400 क्‍युसेक्‍स विसर्गाने पाणी येईल, असा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे शहरातील अवंती नगर, अभिमान श्री, वसंत विहार, यश नगर, गायत्री नगर, गणेश नगर, मडके वस्ती परिसरातील नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

एकरुख मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातून येणारा विसर्ग सुरु राहिल्यास प्रवाहात वाढ होऊ शकते. त्यामुळे तलावातून खाली येणाऱ्या सांडव्याचा विसर्ग वाढल्यास शहरालगतच्या नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्‍यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे. तातडीने याबाबत महापालिका आयुक्‍त पी.शिवशंकर यांना पत्र पाठवून तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

दरम्यान,महापालिका आयुक्‍तांनी,तसेच स्थानिक नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वी या परिसराची पाहणी करुन नागरिकांना सूचना केल्या.त्यांच्या पर्यायी राहण्याची,भोजनाची व्यवस्थाही करण्यात आल्याचे सांगितले.झोन प्रमाणे ठिकाण निश्चिती करण्यात आली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, काही समस्या असल्यास महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सोलापूर पाटबंधारे विभागाने यासंदर्भात जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त ,पोलीस अधीक्षक ग्रामीण ,यांच्यासह तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना एकरुखच्या मध्यम प्रकल्प पुराबाबत सतर्कतेच्या इशाऱ्याची माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *