सोलापूर,दि.11 : काठीला तारेचे हूक बांधून खिडकीतून चोऱ्या करण्याचा नवा फंडा चोरट्यांनी अमलात आणण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारची चोरी जुन्या विडी घरकूल भागातील भाग्यनगर येथे घडली आहे. श्रीकांत जनार्दन इंजामुरी (वय 29) हे गुरुवारी रात्री कुटुंबासह घरामध्ये झोपले होते.
मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बांबूला तारेचा आकडा तयार करून खिडकीतून हात घालून बेडरूम मधील भिंतीला अडकवून ठेवलेली पॅन्ट ओढून घेतली आणि खिशातील रोकड काढून घेतली. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या रंगाच्या 12 साड्या व 2 शालू तसेच मोबाइल हँडसेट असा 34 हजारांचा मुद्देमाल पळवून नेला आहे.
चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घरामध्ये असतानादेखील चोरी करण्याचे धाडस चोरट्यांकडून होत असल्याने नागरिकांमध्ये बीपी चे वातावरण पसरले आहे. आठ दिवसांपूर्वी अशीच एक चोरी शहरात घडली होती. त्या ठिकाणीदेखील चोरट्यांनी काठीला तारेचे हुक बांधून ऐवज लंपास केला होता. चोरी करण्याचा हा नवा फंडा चोरट्यांनी अमलात आणल्याने पोलिसांसमोर नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे. अशाप्रकारे चोऱ्या करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. नागरिकांनीदेखील रात्री झोपताना आपल्या घराच्या खिडक्या बंद केल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे
Leave a Reply