सोलापुरात कोरोनाचा कहर | तब्बल 513 नवे ‘बाधित’;16 जणांचा मृत्यू – या भागातील…

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज सोमवारी दि.7 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 513 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 317  पुरुष तर 196 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 205  आहे. आज  16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 3017 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2504 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 14 हजार 185 इतकी झाली आहे. यामध्ये 8643 पुरुष तर 5542 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 411 जणांचा मृत्यू झाला आहे.

यात 282 पुरुष तर 129  महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 275 आहे .यामध्ये 2 हजार 717 पुरुष तर 1658 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 9 हजार 499 यामध्ये 5644 पुरुष तर 3855 महिलांचा समावेश होतो.

आज या भागातील रुग्ण आढळले…

अक्कलकोट -5

बार्शी – 71

करमाळा – 41

माढा – 42

माळशिरस – 125

मंगळवेढा – 42

मोहोळ – 21

उत्तर सोलापूर – 1

पंढरपूर – 124

सांगोला – 35

दक्षिण सोलापूर – 6

एकूण 513 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.