Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज मंगळवारी दि.8 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 337 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 199 पुरुष तर 138 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 184 आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 3764  कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 3427  अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 14 हजार 522 इतकी झाली आहे. यामध्ये 8842  पुरुष तर 5680 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे .

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 419 जणांचा मृत्यू झाला आहे यात 285  पुरुष तर 134 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 226 आहे .यामध्ये 2 हजार 802 पुरुष तर 1618 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 9 हजार 683 यामध्ये 5755  पुरुष तर 3928 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -0

बार्शी – 63

करमाळा – 43

माढा – 28

माळशिरस – 68

मंगळवेढा – 23

मोहोळ – 2

उत्तर सोलापूर – 4

पंढरपूर – 71

सांगोला – 29

दक्षिण सोलापूर – 6

एकूण 337 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *