MH13 News Network
सोलापुरातील एसटी स्टॅंड परिसरातील पांजरपोळ चौक येथील विश्वमिलन लॉज येथे बेकायदेशीरपणे कुंटणखाना चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलिसांनी विश्व मिलन लॉजवर छापा टाकून कारवाई केली आहे. खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २८ जानेवारी २०२१ रोजी २:३० वाजता बोगस ग्राहक पाठवून, विश्व मिलन लॉजवर ३:१७ वाजता छापा टाकण्यात आला.
यातील आरोपी सुरज अवसेकर (रा. ७, जीवनज्योती गृहनिर्माण संस्था रंगभवन )सोलापूर, राहुल मल्हारी सोनकांबळे, (रा. १२९ मिलींद नगर बुधवार पेठ) सोलापूर, मल्लीनाथ विभुते, (रा. मु. पो. शिंगडगाव, ता. द. सोलापूर), सोपान पांडूरंग लांबतुरे, (रा.थोबडे वस्ती, देगाव नाका )सोलापूर यांनी सहा पिडीत महिला यांची शारीरिक पिळवणूक करुन त्यांना वे-श्या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्यांच्याकडून वे-श्या व्यवसाय करवून घेवून त्याचे कमाईवर स्वत : ची उपजिविका करीत असल्याचे आढळून आले. या आरोपीं विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
असा टाकला छापा..
एसटी स्टँड परिसरात असलेल्या विश्व मिलन लॉजवर पोलिसांना बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची ‘टीप’ मिळाली होती. या माहितीच्या आधारे बोगस ग्राहक पाठवून माहितीची खात्री करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी दुपारी लॉजवर धाड टाकण्यात आली. यावेळी लॉजवर असणाऱ्या त्या 6 पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
ही कारवाई पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर, बंडगर,काळे, ईनामदार, मुजावर, मोरे, मंडलिक व भुजबळ यांनी केली
Leave a Reply