सोलापूर शहर | आजपर्यंत बरे झाले 8278 ; नव्यानं पॉझिटिव्ह 20

सोलापूर शहरात आज शुक्रवारी दि.23 ऑक्टोबर रोजी कोरोनाचे नवे 20 रुग्ण आढळले असून यामध्ये 11 पुरुष तर 9 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 42 इतकी आहे.
आज शुक्रवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 281 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 261 निगेटीव्ह आहेत.
आज 2 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9366 असून एकूण मृतांची संख्या 524 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 564 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 8278 इतकी आहे.