Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

MH13 NEWS Network

सोलापूर शहरात सोमवारी दि. 1 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे नवे 11 रुग्ण आढळले असून यामध्ये 6 पुरुष तर 5 स्त्रियांचा समावेश आहे.

आज सोमवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 376 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 365 निगेटीव्ह तर 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 15 आहे. तर आज कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नसल्याची माहिती देण्यात आली.

पॉझिटिव्ह व्यक्ती…

वर्धमान नगर भवानी पेठ, मुद्रासनसिटीजवळ अक्कलकोट रोड, रेवन सिद्धेश्वर नगर होटगी रोड, मंत्री चंडक नगर शेळगी, राघवेंद्र टॉवरजवळ ७० फूट रोड, ब्रह्मदेव नगर होटगी रोड, फॉरेस्ट रेल्वे लाइन्स, कोनार्क नगर, राघवेंद्रनगर मजरेवाडी, दावत हॉटेलजवळ जुळे सोलापूर, दमाणी नगर देगाव रोड या परिसरातील 6 पुरुष आणि 5 महिला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला आहे.

शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11775 असून एकूण मृतांची संख्या 634 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 315 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 10826 इतकी आहे.

हे आहे महत्वाचे

सोलापूर महानगरपालिकेकडून कोरोना बाधितांची व शहरातील covid-19 हॉस्पिटलच्या माहितीसाठी संपर्क करण्याकरिता कोविड कंट्रोल रूम सोलापूर महानगरपालिका या विभागाकडील मोबाईल क्रमांक 9823291818,व फोन क्रमांक 0 217-2740341 या नंबर वर तसेच ccmsc२०२०@gmail.com या इमेल द्वारे संपर्क करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *