Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी बोलताना पात्रा यांनी नूतन वर्षाच्या मुहूर्तावर स्वामी दर्शन घेता आल्याने नूतन वर्षाचे आनंद द्विगुणित झाला असल्याचे मनोगत व्यक्त केले.

 

यावेळी आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, नगरसेवक महेश हिंडोळे, नागेश कुंभार, विक्रम (बाळा) शिंदे, प्रविण देशमुख, सुनिल गवंडी, विपूल कडबगांवकर, बालाजी पाटील, गिरीश पवार, विपूल जाधव इत्यादी उपस्थित होते.

वटवृक्ष मंदीरात संबीत पात्रा यांचा सत्कार करताना महेश इंगळे, आ.सचिन दादा कल्याणशेट्टी व अन्य दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *