हटके | शेणापासून रंग निर्मिती ; इथे आहे प्रशिक्षणाची संधी

सोलापूर : गायीच्या शेणापासून सेंद्रिय रंग तयार करता येतो आणि त्याचे प्रशिक्षण मिळण्याची सोय सोलापूर जिल्ह्यातील तरुणांना उपलब्ध झाली आहे. सोलापूर सोशल फाउंडेशनने या प्रशिक्षणाच्या बाबतीत पुढाकार घेतला आहे. इच्छुक तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
खादी ग्रामोद्योग मंत्रालय अंतर्गत केंद्रीय मंत्री  नितीनजी गडकरी यांनी गाईच्या शेणापासून पर्यावरण पूरक रंगांच्या निर्मितीविषयी (वैदिक पेंट) निवेदन जाहीर केले होते. शेती व गोधन हे तर अतूट नाते. शेण व गोमूत्र हे शेतकऱ्यांना विविध मार्गाने उत्पन्नाचे पर्याय मिळवून देणारे घटक. आता यापासून केली जाणारी रंगाची निर्मिती ही अनेकदृष्ट्या लाभदायक ठरू शकेल. खादी ग्रामोद्योग मंत्रालय अंतर्गत कुमाराप्पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट, जयपुर व MSME तर्फे याविषयी प्रशिक्षण पुरविण्याची योजनाही जाहीर झाली आहे.
सोलापूर सोशल फाऊंडेशन तर्फे आवाहन करण्यात येत आहे की अधिकाधिक युवकांनी यासाठी पुढे यावे. या प्रशिक्षणासंदर्भात व व्यवसाय आरंभ करण्यासाठी फाऊंडेशन तर्फे आर्थिक व तांत्रिक सहाय्य आपणास केले जाईल. सोलापूरला समृद्ध बनविण्यासाठी, आपली अर्थप्राप्ती वाढविण्यासाठी अवश्य सहभागी व्हावे. हे प्रशिक्षण खादी ग्रामोद्योग मंत्रालय अंतर्गत कुमाराप्पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट, जयपुर व MSME जयपूर येथे दिले जाणार असून या प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी प्रशिक्षण संस्थेने प्रशिक्षणासाठी ५००० रुपये व १८ % जीएसटी असे शुल्क आकारले जाणार आहे, त्याचबरोबर येण्या जाण्याचा खर्च स्वता प्रशिक्षणार्थीनी करावयाचा असून हे प्रशिक्षण १ मार्च २०२१ पासून सुरु होणार असून यासाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२१ आहे, प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असल्यास  व अधिक माहितीसाठी ७७६७०८०९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सोलापूर सोशल फाऊंडेशन तर्फे करण्यात येत आहे.