Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

BIG 9 NEWS NETWORK

देशाचे लोकनेते शरद पवारच्या घरावर झालेल्या दगडफेक हल्ल्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस बार्शी तालुक्याच्या वतीने बार्शी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.”एस टी कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर, कोणाच्या पोटात दुखले की पवारच्या घरावर हल्ला करण्याचं षडयंत्र रचून बनावट एस टी कर्मचारी पाठवून घरावर दगडफेक केली. विरोधकांना माहित आहे की इडी सारख्या संकटनांना महाविकास आघाडीचे मंत्री घाबरत नाहीत,महाविकास आघाडी सरकारचे आधारस्तंभ पवार साहेब यांच्यावरच घाला घातला तर सरकार पडेल या प्रवृततीने भाजपने त्यांचे हल्लेखोर पाठवून हल्ला केला. मी देखील एस टी कर्मचाऱ्याची मुलगी आहे मला एस टी कर्मचाऱ्यांच्या अडी अडचणी जवळून माहीत आहेत एस टी कर्मचाऱ्यांनी कायद्याचा अवलंब करून न्यायीकलढा द्यावा. एस टी कर्मचारी यांनी निवडलेले नेतृत्व गुणरत्न सदावर्ते हा भाजपची राजकारणाची पोळी भाजण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी आणि आयुष्याशी खेळत आहे. सदरील हल्यातील हल्लेखोरखंचा खरा सुत्रधार हा कोण आहे हे शोधून त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्याची मागणी या निवेदनातून केली असल्याचे सोलापूर जिल्ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा अँड सुप्रिया गुंडपाटील यांनी बोलताना सांगितले. यावेळी बार्शी तालुकाध्यक्षा अँड दैवशाला जाधवर, संगिता वडे, उर्मिला दुधाळ उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *