1 डिसेंबरपासून रेशन कार्डधारकांना मिळणार 5 किलो हरभरा डाळ मोफत

नवी दिल्ली । देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये मोदी सरकारने गरीब कल्याण अन्न योजना जाहीर केली होती. या योजनेची शेवटची तारीख जवळ येत आहे. दरम्यान, आता  अंत्योदय अन्न योजना आणि प्रायोरिटी हाउसहोल्ड रेशन कार्डधारकांना रास्त भाव दुकानांमार्फत 1 डिसेंबरपासून 5 किलो हरभरा डाळ मोफत देण्यात येणार आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्याने  सांगितले की, केंद्र सरकार काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात जुलै ते नोव्हेंबर दरम्यान AAY आणि PHH कार्डधारकांना 1 किलो हरभरा देण्याची योजना जाहीर केली.

महत्त्वाचे म्हणजे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची शेवटची तारीख जवळ येत आहे. मार्चमध्ये कोरोना साथीच्या वेळी सरकारने गरीब कल्याण अन्न योजना जाहीर केली. या गरीब कल्याण पॅकेजचा भाग म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सरकारने एप्रिल, मे आणि जून महिन्यात शिधापत्रिकेत नोंदणी केलेल्या सदस्यांच्या आधारे 80 कोटीहून अधिक शिधापत्रिकाधारकांना प्रती व्यक्ती पाच किलो धान्य (गहू किंवा तांदूळ) दिले आहे. तसेच प्रत्येक कुटुंबाला एक किलो डाळही मोफत देण्याची घोषणा केली होती.  हे मोफत 5 किलो धान्य शिधापत्रिकांवर उपलब्ध असलेल्या धान्याच्या सध्याच्या कोट्याव्यतिरिक्त आहे. यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही दिवाळीपर्यंत वाढविण्यात आली.