महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साधेपणाने साजरा; पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण

सोलापूर, दि.1:- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ध्वजारोहण करण्यात आले.
सकाळी आठ वाजता झालेल्या या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक आनंद काजूळकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिका आयुक्त पि.शिवशंकर, सोलापूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.


यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष शेलार, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर आदी अधिकारी उपस्थित होते. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने जारी करण्यात आलेले नियम पाळून कार्यक्रम साधेपणाने साजरा झाला.