बाळे | खंडोबा यात्रेस परवानगी… हे आहेत नियम

Big9news Network

बाळे येथील खंडोबा देवस्थान ट्रस्टने केलेल्या मागणीनुसार सोलापूर महापालिकेने खंडोबा यात्रेस परवानगी दिली असून कोविडचे नियम पाळून यात्रा व्हावी, असे आदेशही पालिकेकडून देण्यात आले आहेत.

खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांनी आणि नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी महापालिकेकडे निवेदन देऊन यंदा खंडोबा यात्रेस परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार आयुक्त तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यात्रेला परवानगी दिली आहे.

यात्रा काळात विविध धार्मिक विधी करताना कोविडचे नियम पाळावेत. मंदिरात गर्दी करू नये. पालखी प्रदक्षिणादरम्यान फक्त पन्नास लोकांना परवानगी देण्यात आली आहे. यात्रा काळात मंदिरात महाप्रसाद वाटप करायला मनाई करण्यात आली आहे. तसेच दर्शनरांगेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे. तसेच मंदिरात येणारी रांग आणि बाहेर पडणारी रांग स्वतंत्र असावी. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना असाव्यात. भक्तांना मास्क बंधनकारक करावे. सॅनिटायझरचाही वापर व्हावा. यासह इतर कोविड नियमांचे पालन करण्याचे आदेश महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.