BIG 9 NEWS NETWORK
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना सोलापूर शहरांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले परंतु राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिकेस विशेष प्रशासकीय अधिकार प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर यांनी दुकानदारांना दिलासा दिलेला होता, त्यामुळे महापालिका आयुक्तांनी आपले विशेष अधिकार वापरून दुकाने सुरू राहण्याचा आदेश दिलेला आहे परंतु शहरातील नागरिकांना आणि विशेषता व्यापारी वर्गांना शनिवारी व रविवारी दुकाने बंद राहतील की चालू राहतील याविषयी मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला होता. यावर MH 13 न्यूज च्या विशेष प्रतिनिधींनी मनपा उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली.
यावेळी उपायुक्त लेंगरेकर म्हणाले की सोलापूर महापालिका क्षेत्रात राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीनुसार शहर हे दुसऱ्या टप्प्यात आले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची दुकानेही दिलेल्या सुधारित आदेशाप्रमाणे सुरू राहतील.आदेशाप्रमाणे दुकाने नियमितपणे सुरू राहतील म्हणजेच लॉकडाऊन होण्याच्या आधी असलेल्या परिस्थितीनुसार शनिवारी-रविवारी दुकाने नियमितपणे सुरू राहतील.