BIG 9 NEWS NETWORK
उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा, गुळवंची, बाणेगाव, मार्डी, भोगाव ,कोंडी ,नान्नज, परिसरात शुक्रवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सकाळपासूनच वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत होता. दरम्यान हवेत दिवसभर गारवा निर्माण झाल्याने जोरदार पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली होती. सायंकाळी चार सुमारास आभाळ भरून आले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास काही प्रमाणात पाऊस पडला नंतर रात्री नऊच्या नंतर जोरदार पावसाने हजेरी लावली.
Leave a Reply