BIG 9 NEWS NETWORK
बाजार समिती मधील शीतगृह जळीत प्रकरणी गुन्हा दाखल असलेले तात्कालीन उपसभापती सुरेश हसापुरे (वय 52,रा.विजापूर रोड) यांचे मुख्य न्यायदंडाधिकारी एस.यम. कनकदंडे यांनी निर्दोष मुक्तता केली.
6 ऑगस्ट 2007 रोजी शित गृहास आग लागली होती. त्यामुळे फॅक्टरी कायद्यान्वये खटला दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सोलापूर इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ उपसंचालक आर.पी.कडकमकर यांनी फिर्याद दिली होती. सुरेश हसापुरे हे अँड सुशील कुलकर्णी यांच्यामार्फत न्यायालयात हजर झाले होते. अँड शशी कुलकर्णी व अँड प्रशांत नवगिरे यांनी युक्तिवाद केला त्यात सुरेश हसापुरे हे उपसभापती होते, मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती येथील शीतगृहाची कोणतीही जबाबदारी नव्हती. परवाना काढण्याची जबाबदारी तात्कालीन व्यवस्थापनाची होती असा मुद्दा मांडला. युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता केली.
Leave a Reply