Big9news Network
महाराष्ट्र शासनातर्फे राबविली जाणारी केंद्रियभूत ऑन प्रवेश प्रक्रीया २०२१, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन (महाराष्ट्र, मुंबई) ने आखून दिलेल्या नियमानुसार प्रथम वर्ष आणि थेट व्दितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी २ नोव्हेंबर २०२१ पासून सुरु झाली आहे. डिसेंबर २१ मध्ये नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेत दोनच फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरीमध्ये विद्यार्थ्याला काळजीपूर्वक ऑन लाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ‘वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला’ डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन (महाराष्ट्र, मुंबई) च्या ई – स्क्रुटिनी सेंटरची मान्यता आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रथम वर्ष आणि थेट व्दितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत व्यवस्थित माहिती देण्याच्या उद्देशाने डब्ल्यू. आय. टी. मध्ये हेल्प डेस्कची सोय केली आहे. २ ते १८ नोव्हेंबर पर्यंत प्रथम वर्ष अभियांत्रिकी इच्छुक विद्यार्थ्यांना ऑंन लाईन रजिस्टेशन करायचे आहे.
ऑंन लाईन पद्धतीत विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करण्याची सोय आहे. त्याच पद्धतीने थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी इच्छुक विद्यार्थांसाठी २ ते २० नोव्हेंबर दरम्यान रजिस्ट्रेशन करण्याचा कालावधी आहे. द्वितीय वर्षाची गुणवत्ता यादी २१ नोव्हेंबर २०२१, तर प्रथम वर्ष प्रवेश गुणवत्ता यादी २७ नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी २८ ते ३० नोव्हेंबर पर्यंत होईल. त्यापूर्वी २३ ते २५ नोव्हेंबर पर्यंत विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठीचा कालावधी आहे. २७ नोव्हेंबर रोजी सीट मॅट्रिक्स प्रसिद्ध होईल. २८ ते ३० नोव्हेंबर या तीन दिवशी इच्छिक विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीसाठी आपल्या पसंतीचे कॉलेज आणि पसंतीची अभ्यासक्रम शाखा (ब्रँच) निवडावयाचे आहे.
फ्रीज आणि फ्लोट या दोन पर्यायाचा उपयोग तज्ञ प्राध्यापकांच्या सल्ल्यानुसार करून घेतल्यास विद्यार्थ्याला पसंतीचे कॉलेज आणि पसंतीची शाखा मिळण्यास मदत होईल. ३ ते ६ डिसेम्बर दरम्यान मिळालेल्या महाविद्यालयात आपली मूळ कागद पत्रे (गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, शुल्क आदि) जमा करून विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. त्याच प्रमाणे दुसऱ्या प्रवेश फेरी प्रक्रियेसाठी रिक्त जागांची यादी ७ डिसेंबर २०२१ रोजी जाहीर होईल. ८ ते १० डिसेंबर २०२१ दरम्यान इच्छुक विद्यार्थ्यांनी अखेरच्या फेरीसाठी आपल्या पसंतीचे कॉलेज आणि पसंतीची अभ्यासक्रम शाखा (ब्रँच) निवडावयाचे आहे. १२ ते १४ डिसेंबर २०२१ रोजी विद्यार्थ्यांना मिळालेले पसंती महाविद्यालय आणि अभ्यासक्रमाची यादी प्रसिद्ध होईल. याच कालावधीत विद्यार्थी मिळालेल्या महाविद्यालात प्रवेश घेऊ शकतो. १५ ते २२ डिसेंबर २०२१ दरम्यान महाविद्यालयातीली रिक्त जागांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी कॅप राऊडच्या बाहेर पडून प्रवेश घेण्याचा कालावधी आहे. थेट व्दितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी पहिली फेरी २२ ते २४ नोव्हेंबर २०२१ आणि १ ते ८ डिसेंबर २०२१ दरम्यान दुसरी फेरी होईल. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील महत्वाचे टप्पे, मागील वर्षाच्या तुलनेत झालेले बदल याबद्दलची माहिती व मार्गदर्शनाची सोय डब्लू. आय. टी. मध्ये करण्यात आली आहे. याचा लाभ अधिकाधिक विद्यार्थी-पालकांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.