Big9news Network
सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी वॉटर ऑडिट करण्याचे काम सध्या सुरू असून त्यासाठी महानगरपालिकेचे मालमत्ता कर विभागातील 100 कर्मचारी यांच्या माध्यमातून प्रत्येकच्या घरोघरी जाऊन पाणी तपासणी अहवाल, मिळकतीची माहिती, मिळकत दाराची माहिती, नळकनेक्शनची माहिती तसेच पाणी साठवून ठेवण्याची क्षमता इत्यादी बाबतची माहिती घेण्यात घेण्यात येत आहे.
त्याच अनुषंगाने आज महापालिका आयुक्त पि.शिवशंकर, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांनी अशोक चौक परिसर,न्यू पछा पेठ, वालचंद कॉलेज परिसर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन मालमत्ता कर विभागातील अधिकारी वॉटर ऑडिटचे कामाची पाहाणी केली. गेल्या तीन दिवसापासून हा सर्व्हे सुरु असून आतापर्यंत 2500 मालमत्ता कराची माहिती गोळा करण्यात आली आहे.तरी नागरिकांनी सुद्धा आमच्या महापालिकेच्या सर्व्हेसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना आपल्या नळ कनेक्शन बाबतची संपूर्ण माहिती द्यावी जेणेकरून शहराला दररोज पाणीपुरवठा कसा करता येईल याचे नियोजन करता येईल.
शहरात काही ठिकाणी मिळकतीवर त्यांच्या नळकनेक्शन घेतल्या आहे पण त्यांना बिले मिळत नाही. तसेच ज्यांनी नळ कनेक्शन साठी अर्ज केला आहे. त्यांनी आमच्या कर्मचारी यांच्याकडे आपली संपूर्ण माहिती द्यावी जेणेकरून त्यांच्या अर्जाचा विचार करण्यात येईल.