शहरासाठी महापालिका आयुक्तांचे नवे आदेश ; जाणून घ्या

Big9news Network

देशभरात ओमायक्रॉन कॉविड १९ व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत या विषाणूचा प्रसाराचा वेग जास्त असल्याने व पुढील काळात त्याचा प्रसार जास्त होण्याची शक्यता आहे. राज्यात देखील गेल्या दोन दिवसांत एक हजारापेक्षा जास्त रुग्ण संख्या झालेली आहे. लग्न समारंभ, नविन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे संपूर्ण राज्यात नवे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर सोलापूर शहरात महापालिका आयुक्तांनी आज 1 जानेवारी रोजी नवी नियमावली जाहीर केली आहे.

दिनांक ३०/१२/२०२१ च्या आदेशानुसार कोविड १९ विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत अतिरिक्त निर्देश जारी करण्यात आलेले आहेत.

महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, सोलापूर महानगरपालिका, यांनी कोरोना (कोविड-१९) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर शहर हदीत सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आदेश जारी केले आहेत.

आदेश…
१ लग्न समारंभासाठी बंदीस्त सभागृहांमध्ये किया खुल्या जागेत जास्तीत जास्त उपस्थितांची संख्या ५० व्यक्तीपर्यंत

२. कोणतेही संमेलन किंवा कार्यक्रम यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी बंदिस्त ठिकाणी किंवा खुल्या जागेत जास्तीत जास्त उपस्थितांची संख्या ५० व्यक्तीपर्यंत मर्यादित असेल.

३. अंत्यसंस्काराच्या विधीसाठी जास्तीत जास्त उपस्थितांची संख्या २० व्यक्तींपर्यंत मर्यादित असेल.

४. शहरातील कोणत्याही पर्यटन स्थळी किंवा असे ठिकाणी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी/ जमाव होण्याची शक्यता आहे. उदा. खुले मैदान, पर्यटन स्थळे इत्यादी अशा ठिकाणी शासनाकडील दिनांक २४/१२/२०२१ च्या आदेशातील निबंधाव्यतिरिक्त संबंधीत स्थानिक व्यवस्थापन प्राधिकरणास योग्य वाटतील असे निर्बंध फौजदारी प्रक्रिया १९७३ चे कलम १४४ नुसार लागू करतील.

५. या आदेशाव्यतिरिक्त अस्तित्वात असलेल्या इतर सर्व निर्बंध पुढील आदेशापर्यंत लागू राहतील,

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती / संस्था अथवा संघटना यांचेवर भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतूदीनुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करणेत येईल.