Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

रविवार दि. ११ जुलै २०२१, सकाळी ११:००वा. गुळवंची तांडा येथील एका सार्वजनिक विहिरीमध्ये गोशाळेमधील एक बैल (वळू) अनपेक्षितरीत्या पडल्याची माहिती गुळवंचीचे सागर राठोड यांनी वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन सोलापूरचे सदस्य संतोषभाऊ धाकपाडे यांना कळवली. ही बातमी कळताच वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन सोलापूरची टीम गुळवंची तांड्याकडे रवाना झाली.

तिथे जाऊन पाहणी केली असता एका ५० ते ६०फूट खोल विहीरीमध्ये एक बैल पडल्याचे दिसून आले. सकाळपासून तो बैल विहिरीतच असल्यामुळे आणि त्याच्या मागच्या डाव्या पायाला जखम झाल्यामुळे तो चांगलाच चवताळलेला दिसून आला. त्याची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी दोन्ही टीम सज्ज झाल्या. त्यावेळी गावकऱ्यांकडून एक क्रेन मागविण्यात आली. WCAS सुरेश क्षीरसागर व ॲनिमल राहत संस्थेचे दीपक घोडके सदस्य त्या बैलाची सुटका करण्याच्या निर्धाराने विहिरीमध्ये उतरले. जवळजवळ दोन ते अडीच तासाच्या अथक परिश्रमानंतर एका बेल्टद्वारे त्या बैलाला बांधून क्रेनच्या साहाय्याने त्याला अलगदरित्या विहिरीबाहेर काढण्यात आले. बैल विहिरीच्या बाहेर येताच गुळवंची तांड्यातील रहिवाशांनी WCAS आणि राहत संस्थेचे टाळ्या वाजवून आभार मानले. विहिरीच्या वरती आलेल्या बैलाची सुखरूपपणे सुटका करून परत गोशाळेमध्ये त्याची रवानगी करण्यात आली.

या बचाव कार्यामध्ये WCAS चे सुरेश क्षिरसागर, संतोषभाऊ धाकपाडे, सोमानंद डोके, अजित चौहान, विनय गोटे इत्यादी सदस्य उपस्थित होते तर ॲनिमल राहत संस्थेचे डॉ. महेश क्षिरसागर व दीपक घोडके उपस्थित होते. बैलाल नियंत्रित करण्यासाठी हरी तोडकरी आणि बेल्ट साठी धनंजय काकडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *