यंदाही शाळेला लागणार नाही मुहूर्त !.. शाळेतील इंट्रीला विद्यार्थी, शिक्षण मुकणार

शाळेचा पहिला दिवस… उन्हाळी सुट्टीनंतर मित्र-मैत्रिणीची भेट होणार…पुन्हा शाळेची घंटा ऐकू येणार …रांगेत उभे राहून राष्ट्रगीताने शाळेची लवकर दिसण्याची शक्यता कमी आहे. अजून दोन ते तीन महिने प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्ष 15 जून पासून ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार आहे. दरवर्षी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव साजरा केला जातो; पण विद्यार्थ्याच्या स्वागताला शिक्षक सलग दुसर्‍या वर्षीही होणार आहेत.
कोरोनाचा राज्यातील प्रादुर्भाव कमी होत असला तरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेत त्याचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू करणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली आहे. शाळांची प्रत्यक्ष घंटा वाजण्याची आणखी दोन-तीन महिने लागू शकतात असेही त्यांनी सांगितले.

शैक्षणिक साहित्याची खरेदी थंड्या बस्त्यात

नवीन शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार असल्याने बाजारातील शैक्षणिक साहित्य खरेदीचे वातावरण थंडावलेले दिसून येत आहे पालकांना आपल्या पाल्यासाठी यंदा वह्या-पुस्तके,दप्तरे, पाण्याच्या बाटल्या, गणवेश आदी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी घाई करावी लागणार नाही. परिणामी बाजारात शैक्षणिक साहित्य खरेदीचा उत्साह ही फारसा दिसणार नाही.

विशेष ब्रिज कोर्स

● शाळा सुरू झाल्यानंतर ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना उजळणीसाठी विशेष ब्रीज कोर्स निश्‍चित केला असून, ब्रिज कोर्स च्या माध्यमातून ही उजळणी 1 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. हा ब्रिज कोर्स दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असणार आहे.

● मात्र, या संदर्भात सूचना शाळांना न दिल्याने यामुळेही शाळांचे नियोजन कोलमडणार असल्याचे प्रक्रिया के.व्हि. के. घाटकोपर सार्वजनिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जगदीश इंदलकर यांनी दिली.