#Boycott kareena khan ; करीनावर नेटिझन्स संतापले,हे आहे कारण

Big9news Network

सीतेच्या भूमिकेवरून करीना खान कपूर ट्विटरवर ट्रोल होत आहे.
रामायण या येणाऱ्या बहुचर्चित मोठ्या बजेटच्या चित्रपटांमध्ये सीतेची भूमिका करीना कपूर करणार आहे अशी माहिती ट्विटरवरून कळताच नेटकर यांनी बॉयकॉट करीना खान हा ट्रेण्ड सुरू केला आहे.

बॉलीवूड मध्ये रामायण वर आधारित 1 बिग बजेट प्रोजेक्ट येत असून यामध्ये करीना कपूरला सीतेच्या मुख्य भूमिका स्वीकारण्याची ऑफर मिळाली आहे. परंतु तिने या भूमिकेसाठी तब्बल 12 कोटी रुपयांची मागणी केली त्यामुळे हा बिग बजेट प्रोजेक्ट लांबणीवर गेल्याची चर्चा आहे.

रामायण हा बिग बजेट प्रोजेक्ट लांबणीवर गेल्यामुळे नेटिझन्स संतापले आणि त्यांनी करीनाला टोल करण्यास सुरुवात केली. सीता ही एक पवित्र व्यक्तिरेखा आहे हिंदू लोकांसाठी आदराचे स्थान असलेल्या सीतेची भूमिका साकारण्यासाठी करीना सारखी लालची अभिनेत्री घेणं चुकीचं आहे. या सीतेच्या भूमिकेसाठी एक हिंदूच अभिनेत्री घ्या अशी मागणी संतापलेले नेटिझन्स करत आहेत. त्यामुळे बॉयकॉट करीना खान असे म्हणत तिच्यावर जोरदार टीका सोशल मीडियावर नेतीझन्स करीत आहेत.