Big9news Network
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय, विद्यापीठ प्रवेश, अभियांत्रिकी, वैद्यकीय पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शिष्यवृत्तीसाठी 23 जून 2021 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी शुभांगी कांबळे यांनी केले आहे.
अनुसूचित जमातीच्या 10 विद्यार्थ्यांना परदेशात पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यानुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्जाचा नमुना अटी व शर्तीसाठी प्लॉट नं-२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, आर्कीटेक्ट कॉलेजजवळ, कुमठा नाका परिसर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, सोलापूर तसेच प्रभारी सहा.प्रकल्प अधिकारी (शिक्षण) विशाल सरतापे (8668774254) यांच्याशी संपर्क साधावा किंवा ईमेल poitdp.solapur-mh@gov.in येथे संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती कांबळे यांनी केले आहे.