Big9news Network
अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर शहर समितीच्या नवनियुक्त पदाधिकारी यांचा नियुक्तीपत्र प्रदान व पदग्रहण समारंभ सोहळ्यात खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी सोलापूर व सोलापुरातील परिसरातील वारकऱ्यांच्या निवासासाठी भजन-कीर्तन कार्यक्रमासाठी वारकरी भवन तयार करून जानेवारी मध्ये सदर वारकरी भवन यांचा भव्य भूमिपूजन कार्यक्रम करण्यात येईल असे मनोगत व्यक्त केले.
सदर वारकरी भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करणार असल्याचे सोलापूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते नगरसेवक चेतन नरोटे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून सर्वसमावेशक ट्रॅक्टर अध्यात्म व सामाजिक कार्य करण्याचे आवाहन करत 70 टक्के अध्यात्म व 30 टक्के समाज कार्य करावे असे नूतन पदाधिकारी यांना सांगितले.
याप्रसंगी सोलापूर जिल्हाध्यक्ष ह भ प किरण महाराज बोधले जिल्हा सचिव ह भ प नवनाथ काकडे गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमास हभप अभिमन्यू महाराज पाटील ह-भ-प दिगंबर फंड महाराज हभप प्रभाकर महाराज वाकचौरे, अमोल भोसले लक्ष्मण जगताप नागेश भाऊ खरात राणा यादव, ह. भ. प. रमेश महाराज सोलापूरकर उपस्थित होते सोलापूर शहराध्यक्षपदी ह. भ. प. सुभाष महाराज शिंदे, उपाध्यक्ष सुरेश भांगे महाराज सचिव गणेश महाराज शिंदे अध्यक्ष गोपाळ लोंढे महाराज, हरी वैद्य महाराज सहसचिव श्रीकांत कोकितकर, प्रसिद्धी प्रमुख माऊली महाराज संपर्कप्रमुख माऊली बचुटे कोषाध्यक्षपदी गोवर्धन मायकल दिल्लीवर सप्ताह समिती प्रमुख शिवाजी महाराज पोतदार आणि सर्व वारकरी मंडळ उपस्थित होते.
Leave a Reply