Big9news Network
रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी आणि नवीन ठजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ दिगंबरराव वडजे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
तिरुपती कन्स्ट्रक्शनने माळशिरस येथे माऊली चौक ते कचरेवाडी या मार्गाचे डांबरीकरण केले होते. या कामाचा चेक तिरुपती कन्स्ट्रक्शनच्या बँक खात्यावर जमा केल्याप्रकरणी बिलाच्या 3 टक्के रक्कम लाच म्हणून वडुजे यांनी ठेकेदाराला मागितली होती. याबाबतचा तक्रार अर्ज संबंधिताने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिला होता. यानंतर या विभागाने माळशिरस येथील नगरपंचायतीत सापळा लावला. यावेळी मुख्याधिकारी वडुजे यांनी संबंधिताला बँक खात्यावर चेक जमा केल्याप्रकरणी १ लाख व नवीन काम मिळवून देण्यासाठी १६ हजार असे १ लाख २६ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते.