Big9news Network
भजन कार्यक्रमासाठी जात असताना अचानक गाडीचे ब्रेक फेल झाल्याने जीप दरीत कोसळून, झालेल्या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असणाऱ्या तोरणमाळजवळील सिंदीदिगर घाटात घडली. या अपघातात ८ प्रवासी जखमी झाले आहेत.
या गाडीत ३० जण प्रवास करत होते. वाहनचालक अपघातानंतर पसार झाला आहे. अपघातात गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्यासाठी धाव घेतली. मृतातील सर्व मध्य प्रदेशातील राहणारे असून ते तोरणमाळजवळील चिखली दिगर येथे भजन कार्यक्रमासाठी येत होते.
मृतातील सहा जणांची ओळख पटली असून, त्यात गुमानसिंग तुळशीराम, वेरांग्या धनसिंग, भाकीराम सेवा, कवल रेहमसिंग, मुन्नालाल तडवी, खागीराम ठंडला यांचा समावेश आहे.