सोलापूर हाय फ्लायर्स राउंड टेबल 309 संस्थेच्या स्तुत्य उपक्रम -महापौर श्रीकांचना यन्नम
सोलापूर दि.२ (प्रतिनिधी) सोलापूर हाय फ्लायर्स राउंड टेबल 309 या जागतिक सामाजिक संस्थेच्यावतीने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी महापालिकेच्या बाँईज हाँस्पीटलला सात आँक्सीजन काँन्सन्ट्रेटर मशीन आज महापौर कार्यालयंत येथे महापौर श्रीकांचना यन्नम व महापालिकेचे आयुक्त पि. शिवशंकर यांच्याकडे हे सात आँक्सीजन काँन्सन्ट्रेटर मशीन प्रदान देण्यात आले. यावेळी उपायुक्त धनराज पांडे,राऊंड टेबल इंडिया चे नॅशनल कम्युनिटी सर्विस कनवेनर तरंग शहा, व्हाइस चेअरमन रोहित राठी,अभिजित मालाणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी कोरोनाच्या काळामध्ये महापालिकेला सहकार्य केल्याबद्दल व त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम घेतल्याबद्दल आभार मानले. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना पाँझेटिव्ह रुग्णांना उपचारासाठी बेडची कमतरता आहे. आँक्सीजनचा तुटवडा आहे. व्हेंटिलेटर कमी आहेत. वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांचा म्रुत्यु होत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधीलकी म्हणून आमच्या संस्थेने सात आँक्सीजन काँन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या रुग्णालयात शहरातील गरीब तसेच दारिद्रय रेषेखालील व्यक्तींवर मोफत उपचार केले जातात. त्यामुळे महापालिकेच्या बाँईज हाँस्पीटलला या सात मशीन विनामूल्य देत आहोत असेही राठी यांनी सांगितले.राउंड टेबल इंडिया ही संस्था समाजातील दारिद्रय रेषेखालील गरीबांना जगभर मदत करत असते. भारतातील ८० शहरांत या संस्थेचे काम चालते.वंचित मुलांना शैक्षणिक मदत करते. अनेक शहरांत शाळा तसेच वर्गखोल्या उभ्या करून दिल्या आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षांपासून शाळा बंद आहेत. म्हणून यंदा आरोग्य क्षेत्राला मदत करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे असेही आशुतोष राठी यांनी सांगितले.
गेल्या वर्षी कोरोनामुळे लाँकडावुन असताना राऊंड टेबल हाय फ्लयर्स 309 ह्या संस्थेच्यावतीने साडे सहा हजार गरजू व्यक्तींना भोजन दिले होते. येत्या मंगळवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील चारशे कुटुंबाना अन्नधान्य तसेच नित्योपयोगी वस्तुंचे वाटप केले जाणार आहे. यामध्ये धान्य,साबण, सँनिटायझर आणि मास्क यांचा समावेश असेल असेही राठी यांनी सांगितले.
Leave a Reply