Big9News Network
आज निफाड तालुक्यातील विंचूर येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रमुख जिल्हा मार्ग 69 ते मरळगोई विंचूर सुभाषनगर, कोळवाडी ते निफाड रस्ता ( प्रजीमा 124) किमी 00/00 ते 2/00 व 7/500 ते 12/00 ची सुधारणा करणे, तालुका निफाड जिल्हा नाशिक कामांचे (अंदाजित रक्कम 310 लक्ष) भूमिपूजन व फलकाचे अनावरण संपन्न् झाले.
यावेळी येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार, मुंबई बाजार समितीचे संचालक तथा लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य हरिश्चंद्र भवर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, तहसीलदार शरद घोरपडे,उपअभियंता अर्जून पवार, शाखा अभियंता गणेश चौधरी, , विलास गोरे,नाना जेऊघाले, आत्माराम दरेकर, मंगश गवळी आदी उपस्थित होते.