1 मे | सोलापुरात भव्य आरोग्य शिबाराचे आयोजन ; हजारो नागरिकांनी घेतला लाभ

 

1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिना निमित्त तसेच प्रभाग 22चे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक श्री.नागेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित माजी गटनेते किसन जाधव, युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड आणि ईच्छा भगवंताची मित्र परिवार यांच्या वतीने उदय विकास प्रशालेत आयोजित सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.प्रभागातील व आजूबाजूच्या परिसरातील 1142 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिरास राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी शहर राष्ट्रवादी अध्यक्ष भारत जाधव, प्रदेश सचिव संतोष भाऊ पवार, ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर महेश कोठे, महिला शहराध्यक्ष नगरसेविका सुनीता रोटे, महिला कार्याध्यक्ष लता ढेरे, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, दादाराव रोटे, शशिकला कस्पटे यांच्यासह दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले.

दीप प्रज्वलन नंतर प्रास्ताविक करताना माजी गटनेते किसन जाधव यांनी आरोग्य शिबिराचा लाभ प्रभागातील सर्व नागरिकांसाठी मोफत करून देण्यात आल्याचे सांगितले व यानंतर पालकमंत्र्यांनी मनोगत व्यक्त करताना किसन भाऊ जाधव वाढदिवस मूर्ती नागेश अण्णा गायकवाड यांना अभिष्टचिंतन पर शुभेच्छा देताना त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


यावेळी SLB रिक्षा थांबा, लिमऐवाडी येथे पाणपोई चा शुभारंभ देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते मनपा सफाई कामगार तसेच रामवाडी यूपीसी सेंटर च्या आशा वर्कर्स, परिचारिका यांचा सत्कार शाल, श्रीफळ व साडी भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
मिलिंद गोरे, गिरीश जाधव, प्रेरणा मैदर्गिकर, उषा बामणे, उदय विकास प्रशालेचे विश्वस्त अमोल जाधव यांची यावेळी प्रार्थनीय उपस्थिती होती.

सदर आरोग्य शिबिरासाठी लायन्स क्लब दमानी नगर आधार हॉस्पिटल व रामवाडी यूपीसी सेंटर यांचे तसेच डॉ.स्वरांजली पवार, डॉ. अनुलता रणखांबे, डॉ.शेटे मॅडम यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी माणिक कांबळे, वसंत कांबळे, आकाश जाधव, अमोल जगताप, हुलगप्पा शासम, हृषिकेश येवले, सौरभ पाताळे, तेजस गायकवाड, प्रेम गायकवाड, अभिजित कदम, उत्तम देढे, माऊली जरग, दर्शन दुबे, अभिषेक अनव्हेकर, महासिद्ध म्हमाणे, रमेश देशपती, आधार हॉस्पिटल चे अंजली गायकवाड, UPC सेंटर च्या रेखा गायकवाड, पुनम जाधव यांनी मोलाचे परिश्रम घेतले.