Day: October 16, 2020
-
तत्कालीन मनपा आयुक्त व नगरअभियंता यांच्यावर फोजदारी गुन्हे दाखल करा ; मंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख यांचे निवेदन
सोलापुरातील बिल्डर लॉबीने मनपाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने ‘नैसर्गीक शेळगी नाल्याची” वाट लावून लाखो रुपये खर्चून स्वप्नवत बांधलेल्या घरात पावसाळी पाण्याची लाट आणली याची सखोल चौकशी होणेबाबतचे निवेदन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिले आहे. सोलापूर शहरांत जुना पुणे नाका येथे शेळगी कडून येणारा नाला पुणे नाका स्मशानभूमी,गणेश नगर,अवंती नगर,आर्यनंदी नगर,थोबडे…
-
PHOTO | NDRF च्या मदतीने होतेय जलप्रकोपातून सुटका
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठी दाणादाण उडवली. मागील शंभर वर्षात अशा प्रकारचा जलद प्रकोप पाहिला नाही असे सार्वत्रिक बोलले जात आहे. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी, शिवणी, पाकणी आणि तेलगाव येथे पुराच्या पाण्याने हाहाकार घातला असून बरेच लोक अडकले होते. महसूल व पोलिस प्रशासन यांच्या प्रयत्नाने NDRF च्या 2 तुकड्या बोटसह दाखल होऊन अडकलेल्या…
-
पंढर ‘पूर’ | आठ हजारावर नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले; प्रशासन सज्ज
परतीच्या पावसाने सतत सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे उजनी व वीर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे, नीरा व भीमा नदी काठी पुरस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील 8 हजार 400 नागरिकांचे प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. पूरस्थित मदत व बचाव कार्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. भीमा नदीत संगम येथे उजनी धरणातून…
-
पिकांचे, घरांचे सूक्ष्म पंचनामे करा ; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना
गेल्या दोन दिवसांत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तसेच पडझड झालेल्या घरांचे सूक्ष्म पंचनामे करावेत. कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी व बाधित कुटुंब वंचित राहणार नाही याची दक्षता संबधितांनी घ्यावी अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. श्री. भरणे यांनी आज पंढरपूर येथील कुंभारघाट येथे भेट देवून पाहणी केली तसेच चंद्रभागा नदीच्या तीरावरील कुंभार घाटावरील संरक्षित भिंत कोसळल्यामुळे…
-
धुतर ससाणाचे सोलापुरात पहिल्यांदाच मिळाले फोटोग्राफी रेकॉर्ड
सोलापुरातील वन्य जीव मित्र व हौशी फोटोग्राफर संतोष धाकपाडे हे नेहमीप्रमाणे बुधवारी सुट्टी असल्याने त्यांच्या मुलांबरोबर म्हणजेच सुरज आणि राकेश बरोबर हिरज परिसरात फेरफटका मारायला गेले असता त्यांना एक शिकारी पक्षी दिसून आला. संतोष यांना पहिल्यांदा तो पक्षी बहिरी ससाणा सारखा दिसून आला. त्यांनी व त्यांच्या मुलांनी त्या पक्ष्याचे फोटो काढून घेतले. संतोष यांनी त्या…
-
दक्षिण,उत्तर पाहणी दौरा ; नुकसान भरपाई मिळवून देऊ :आ.देशमुख
सोलापूर : दक्षिण आणि उत्तर तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना शासनाकडे पाठपुरावा करुन त्वरित नुकसान भरपाई मिळवून देऊ, अशी ग्वाही आ. सुभाष देशमुख यांनी देत ग्रामस्थांना धीर दिला. यावेळी आ. देशमुख यांनी गावकर्यांची राहण्याची आणि खाण्याची त्वरित व्यवस्था करण्याचे आदेश अधिकार्यांना दिले. आ. देशमुख यांनी शुक्रवारी दक्षिण तालुक्यातील चंद्राळ, उत्तर तालुक्यातील तिर्हे, शिवणी, तेलगाव, पाकणी, नंदूरसह…
-
चक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…
अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक टोला लगावत सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने नवी पेठेत मड बाईक रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज शुक्रवारी दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी गांधीगिरी आंदोलन हाती घेण्यात आले. सोलापुर महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरात सर्वत्र खड्डे पडले असुन त्याचा,…
-
मदत कार्यासाठी ‘एनडीआरएफ’ची टीम दाखल ; अडकून पडलेले सुरक्षितस्थळी हलवले
अक्कलकोट,दि.15 : अक्कलकोट तालुक्यात परतीच्या पावसाने सर्वत्र कहर केला असून अनेक गावच्या नदी-नाल्यांना महापूर आल्याने गावचा संपर्क तुटला असून एनडीआरएफच्या मदतीने नदीपलीकडे अडकलेल्या शेकडो नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. हजारो हेक्टर शेतात पाणी शिरल्याने शेतकर्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. तुळजापूर, उमरगा, अक्कलकोट तालुक्यात चित्रा नक्षत्राच्या पावसाने 13 ऑक्टोंबर ते…
-
इंगळगी-शिरवळ धुबधुबी धरण ओवरफ्लो
दक्षिण तालुक्यातील इंगळगी-शिरवळ धुबधुबी धरण निर्मितीपासून दुसऱ्यांदा शंभर टक्के भरून वाहत असल्याने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. माजी आमदार कै. वि. गु. शिवदारे अण्णा यांच्या प्रयत्नामुळे सन 2000 मध्ये या धरणाची निर्मिती झाली. त्यानंतर धरण 2006 मध्ये शंभर टक्के भरले…
-
आज ग्रामीण भागात बरे झाले 248 ;तर पॉझिटिव्ह रुग्ण 125, वाचा…
आज शुक्रवारी दि.16 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 125 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 68 पुरुष तर 57 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 248 आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 1402 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1277 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील…