Month: October 2020
-

सोलापूर शहर | आजपर्यंत बरे झाले 8278 ; नव्यानं पॉझिटिव्ह 20
सोलापूर शहरात आज शुक्रवारी दि.23 ऑक्टोबर रोजी कोरोनाचे नवे 20 रुग्ण आढळले असून यामध्ये 11 पुरुष तर 9 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 42 इतकी आहे. आज शुक्रवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 281 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 261 निगेटीव्ह आहेत. आज 2 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची…
-

10 हजार कोटींची मदत जाहीर -मुख्यमंत्री ठाकरेंनी केली घोषणा
मुंबई,दि.23 : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपये जाहीर करत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. अतिवृष्टीने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. संकटामागून संकट आली आहेत. शेतकऱ्यांना आतापर्यंत 30 हजार 800 कोटी दिले आहेत.…
-

शिक्षणासाठी मदत करणे श्रेष्ठ भावना : रेवणसिद्ध वाडकर
सोलापूर : मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो वैयक्तिकरीत्या अथवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारे समाज कार्य व मदतकार्य करीत असतो. मात्र त्यामध्ये शिक्षणासाठी मदत करणे ही सर्वश्रेष्ठ भावना आहे असे प्रतिपादन श्री काशी पीठ शिष्यवृत्ती योजना प्रमुख व माजी मुख्याध्यापक रेवणसिद्ध वाडकर यांनी केले. वीरशैव व्हिजनतर्फे समर्थ हिरेमठ या विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती देताना ते बोलत…
-

आज ग्रामीण भागात 10 जणांचा मृत्यू; तर नवे पॉझिटिव्ह 177
आज गुरुवारी दि.22 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 177 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 106 पुरुष तर 71 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 237 आहे. आज 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 1641 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1464 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर…
-

शहरात नवे 21 पॉझिटिव्ह ; टेस्टिंग अजूनही कमीच…!
सोलापूर शहरात आज गुरुवारी दि.22 ऑक्टोबर रोजी कोरोनाचे नवे 21 रुग्ण आढळले असून यामध्ये 15 पुरुष तर 6 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 26 इतकी आहे. दिवसेंदिवस टेस्टिंग कमी होत असल्याचे दिसून येत आहे.बुधवारी रात्री 12 पर्यंत सुद्धा केवळ 381 टेस्टिंग झाल्या असून संभाव्य धोका लक्षात घेता तपासणी वाढणे…
-

शेतकऱ्यांनी धीर धरावा, शासन खंबीरपणे पाठीशी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
उस्मानाबाद :- जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान वझालेले दिसून येत आहे. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची दैनंदिन माहिती प्रशासनाकडून घेतच होतो. परंतु आज येथील शेतकरी बांधवांना भेटून त्यांना दिलासा दिला आहे. तरी शेतकऱ्यांनी धीर धरावा शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांना समाधान मदत देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव…
-

नर्मदा हॉस्पिटलने परत केले रुग्णांचे अवाजवी बिल ; महापालिकेचा ऑडिट दणका
सोलापूर महानगरपालिका अंतर्गत कोविड – १९ कंट्रोल रूमचे कामकाज चालते. कंट्रोल रूम मार्फत नर्मदा हॉस्पिटल मधील कोविड POSITIVE रुग्णांचे बिलांचे लेखा परीक्षण करण्या करिता लेखाधिकारी म्हणून नेमणूक केलेले आहेत. धनराज पांडे, उपायुक्त व सनियंत्रण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लेखा परीक्षक सर्फराज मोमीन, झिन्जुरे व विष्णु गाडे यांनी बिलांचे लेखा परीक्षण केले असता एकूण ४३ रुग्णांचे ५,००,५४०/…
-

‘विद्यापीठा’च्या अंतिम वर्षाचा निकाल 31ऑक्टोबरपर्यंत
सोलापूर, दि. 21- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या सर्व परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये 99.86% विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली तर 0.14 टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा दिली. केवळ 133 विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणीक शहा यांनी दिली. कोरोना महामारीमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर…
-

एकनाथ खडसे बांधणार हातात ‘घड्याळ’ ; कमळाला सोडचिठ्ठी
एकनाथ ‘भाऊ’ खडसे यांनी अखेर हातात घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला असून येत्या शुक्रवारी ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मागील काही दिवसांपासून नाराज असलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या वारंवार विविध वक्तव्यावरून भाजपला धक्के मिळत होते. आज खडसे यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे पत्र प्रसिद्ध केले. त्यांनी भाजप पक्ष सोडला असून शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे…
-

आज सोलापूर शहरात कोरोना बाधित 19; तर 3 जणांचा मृत्यू
सोलापूर शहरात आज बुधवारी दि.21 ऑक्टोबर रोजी कोरोनाचे नवे 19 रुग्ण आढळले असून यामध्ये 9 पुरुष तर 10 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 45 इतकी आहे. आज बुधवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 373 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 357 निगेटीव्ह आहेत. आज 3 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची…
