Month: October 2020
-

नुकसानीचे पंचनामे गतीने करुन प्रस्ताव पाठवा -ठाकरे सरकारने दिले आदेश
सोलापूर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला आधार देण्याची गरज असून त्यासाठी लवकरात लवकर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन मदतीसाठीचे प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिले. सोलापुरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी निर्देश दिले. नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीस…
-

अतिवृष्टीग्रस्तांना लवकरात लवकर मदत ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
सोलापूर :- हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकही जीव गमावता कामा नये, काळजी करु नका, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खूर्द येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागास भेट देवून ग्रामस्थांसोबत संवाद साधून…
-

वाऱ्यावर सोडणार नाही ; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला नुकसानग्रस्तांना दिलासा
सोलापूर, दि. १९ : नुकसानग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील रामपूर येथील…
-

अक्कलकोट| 81 गावांतील ‘त्या’ 629 घरांचे पुनर्वसन , पिकांची नुकसान भरपाईची मागणी -वाचा सविस्तर
सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील गावांमध्ये केवळ 2 दिवसात हाताला आलेलं पीक डोळ्यासमोर पुराच्या पाण्याने नासलेले बळीराजाने बघितलं तर राहत्या घरात पाणी घुसल्याने संसार उघड्यावर पडला याची दखल घेत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री श्री विजय वड्डेटीवार यांना अक्कलकोट तालुक्यात बोरी नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानाची निवेदन देऊन माहिती दिली. आणि तात्काळ पंचनामे करून…
-

ग्रामीण भागातील दहा जणांचा मृत्यू; तर नवे पॉझिटिव्ह 111
आज सोमवारी दि.19 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 111 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 74 पुरुष तर 38 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 215 आहे. आज 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 1043 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 932 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर…
-

सोलापूर | भवानी पेठ परिसरातील एकजणांचा मृत्यू ; 17 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…
सोलापूर हद्दीत आज सोमवारी दि.19 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 17 रुग्ण आढळले असून यामध्ये 12 पुरुष तर 5 स्त्रियांचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 48 इतकी आहे. यामध्ये 38 पुरुष तर 10 महिलांचा समावेश होतो. आज सोमवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार फक्त 258 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये…
-

Photo | मुख्यमंत्री ठाकरे यांचा पूरस्थिती पाहणी दौरा ; शेतकऱ्यांशी साधला संवाद
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यादरम्यान रामपूर येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची आणि इतर नुकसानीची पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.
-

मी राजीनामा दिलेला नाही आणि भाजप पक्ष सोडलेला नाही;एकनाथ खडसे
भारतीय जनता पार्टीवर गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली होती. जळगावात गेल्या काही दिवसांपासून घटस्थापनेच्या दिवशी एकनाथ खडसे भाजपा सोडणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. एकनाथ खडसे यांनी भाजपाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा आणि वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलं होतं. मात्र एकनाथ खडसे यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत मी…
-

जुळे सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध;खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी
सोलापूर,जुळे सोलापूर शहर हद्द वाढ भागातील समस्येबाबत संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष शाम कदम यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना शेळगी येथील मठात भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड च्या शिष्टमंडळ यांच्याशी सोलापूरच्या विविध प्रश्नांवर सुमारे अर्धा तास चर्चा करण्यात आली. आसरा चौकातून जुळे सोलापूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेला…
-

आपल्यासाठी आजही ‘मास्क” हीच लस – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सुरक्षित आणि निरोगी महाराष्ट्रासाठी आपण सगळे घेऊया, ‘MAH कसम’ कोरोना विरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी ‘मां कसम’ सर्वांनी घ्यावी असे आवाहन…
