Day: November 14, 2020
-
कोळा विद्यामंदिरचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदीप्यमान यश
कोळा (वार्ताहर) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांचेकडून फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इ.5 वी आणि इ.8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत कोळा विद्यामंदिर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर प्राविण्य राखत उज्ज्वल यश संपादन केले आहे.इ.5 वी मधील 28 विद्यार्थ्यांपैकी 24 विद्यार्थी पात्र झाले असून एक विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत तर इ.8 वी मधील 22 विद्यार्थ्यांपैकी 18 विद्यार्थी पात्र झाले…
-
विमानाने प्रवास करून मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
नागपूर : विमानाने प्रवास करून दुसऱ्या शहरात जाऊन महागडे मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.झारखंडमधील ही टोळी कोलकात्यातून चक्क विमानाने प्रवास करुन नागपुरात यायची. विमानाने नागपूर गाठून विदर्भातील विविध शहरातील गर्दी असलेल्या बाजारांमध्ये नागरिकांच्या खिशातून महागडे मोबाईल चोरणाऱ्या एका टोळीला नागपूरच्या अंबाझरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 14 मोबाईल फोन जप्त केले…
-
आज ग्रामीण भागात निगेटिव्ह 1527; तर नवे पॉझिटिव्ह 135
आज शनिवारी दि.14 नोव्हेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 135 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 104 पुरुष तर 31 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 132 आहे. आज 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 1662 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1527 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर…
-
ही श्रींची इच्छा ; मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडणार – पहा केव्हापासून उघडणार मंदिरे
मुंबई दि १४ : पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणतात की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड…
-
आज शहरात नवे कोरोनाबाधित 24; तर एक जणांचा मृत्यू
सोलापूर शहरात आज शनिवारी दि.14 नोव्हेंबर रोजी कोरोनाचे नवे 24 रुग्ण आढळले असून यामध्ये 15 पुरुष तर 9 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 11 इतकी आहे. आज मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 700 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 676 निगेटीव्ह आहेत. आज 1 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद…
-
ट्रॅव्हल्स 40 फूट खोल दरीत कोसळून 6 जणांचा मृत्यू
पुणे-बंगलोर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. गोव्याला फिरायला जात असताना काळानं घाला घातला आहे. उंब्रज जवळील तारळी नदीजवळ हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला आहे. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्सनं गोव्याला जात असताना उंब्रज नदीजवळ ही गाडी अचानक कठडा सोडून 40 फूट खोल कोसळली. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सात जण गंभीर जखमी झाले…
-
मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला ट्रकची धडक, 3 जण जागीच ठार
सोलापूर,दि.14 : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर एका रुग्णवाहिकेला (Ambulance) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात रुग्णवाहिकेतील 3 जण जागीच ठार झाले, तर सात जण जखमी झाले आहे. या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तेलंगणा येथील एक कुटुंब नातेवाईकाचा मृतदेह घेऊन निघाले होते. शनिवारी पहाटे ३.४५ वाजता त्यांची अॅबुलन्स मोहोळ शहरातील कन्या प्रशाला चौक येथे आली…
-
३८ लाखांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल
सोलापूर,दि.१४ : व्यवसायासाठी गुंतवलेली रक्कम व नफा रक्कम न दिल्याप्रकरणी जहीर अहमद बशीर अहमद ( रा. न्यू मेलापल्ली, हैदराबाद, तेलंगणा ), मिझ आबिद बेग मिर्झ अहमद बेग ( आसिफ नगर , हैदराबाद ) यांच्याविरुध्द सदर बाझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अब्दुल राऊफ इमाम खान ( वय ५१, कसावा हाईटस्, नेरूळ नवी मुंबई,…
-
अक्कलकोट रस्त्यावरील कल्पना नगरात २.८६ लाखाची चोरी
सोलापूर : अक्कलकोट रस्त्यावरील कल्पना नगरातील घर फोडून चोरट्यांनी २ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरट्यांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास संतोष शिवशरण सिंदगी (वय २६ ) यांच्या घराच्या गच्चीच्या पायऱ्यांवरुन किराणा दुकानात प्रवेश केला आणि लोखंडी कपाट उचकटून त्यातील नऊ तोळ्यांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने व पाच हजारांची रोकड असा २ लाख ८६ हजारांचा…
-
इम्पॅक्ट | MH 13च्या क्राइम ब्रँचने फोडला नागपुरात ‘ॲटम बॉम्ब’ ; आयपीएल सट्टा कनेक्शन …वाचा
विशेष प्रतिनिधी /सोलापूर सोलापूर शहर परिसर आयपीएल सट्टा बाजार जोरात असल्याची वृत्तमालिका MH 13 न्यूजवर प्रकाशित होत झाली.त्याची दखल घेऊन शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार क्राईम ब्रांचने धडाकेबाज कारवाई करून आयपीएल कंपनीच्या दांड्या उडवल्या आहेत .परराज्यातील असलेलं कनेक्शन ट्रॅक लावून गुन्हे शाखेने उध्वस्त केले. आणि आता तर सोलापुरातील आयपीएल सट्टा लिंक नागपुरात…