Day: November 15, 2020
-
आज ग्रामीण भागात बरे झाले 148; तर नवे बाधित 113
आज रविवारी दि.15 नोव्हेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 113 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 77 पुरुष तर 36 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 148 आहे. आज 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 914 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 801 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर…
-
मन्ना जुगार | जुगारावर छापा ; पावणेदोन लाखाचा ऐवज जप्त
सोलापूर : वळसंग पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून १० जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रकमेसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वळसंग पोलिसांनी गंगाप्रसाद पेट्रोलपंपाच्या पाठीमागील शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकला. या छाप्यात १० आरोपी हे पत्ते खेळताना मिळून आले. त्यांच्याकडून ८ मोबाइल, २ दुचाकी, १० हजार १०० रुपयांची रोकड असा…
-
राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज;यंदाची दिवाळी होणार गोड
मुंबई : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. कोरोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहचवणे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.…
-
सोलापूर ते विजापूरकडे जाणाऱ्या जडवाहतुकीकरिता हे आहेत मार्ग…
सोलापूर : शहरातील संभाजी (कंबर) तलाव जवळ असलेला विजापूर रस्ता जडवाहतुकीसाठी आणखी 6 दिवस बंदच राहणार असल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी दिली. संभाजी तलावाजवळील रेल्वे पुलाजवळ ड्रेनेजलाइन दुरुस्तीचे काम महापालिकेच्यावतीने चालू आहे. सदर कामाकरिता पत्रकार भवन चौक ते झाशीची राणी पुतळा हा मार्ग पूर्णपणे 14 नोव्हेंबर पर्यंत हलकी व…